Pre-Wedding Photoshoot | ब्राह्मण समाजाकडून प्री-वेडिंग फोटोशूटला विरोध! बंदीसाठी केली मागणी

Pre-Wedding Photoshoot | धुळे: आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लग्नाआधी वधू आणि वर फोटोशूट करतात. मात्र, अनेक समाजाडून प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. अशात मराठा संघापाठोपाठ श्री शुक्ल यजुर्वेद गोवर्धन ब्राह्मण समाजाकडून प्री-वेडिंग फोटोशूटला विरोध केला जात आहे.

Brahmin community opposes pre-wedding photoshoot

धुळ्यात गोवर्धन ब्राह्मण मंडळाने प्री-वेडिंग शूटवर (Pre-Wedding Photoshoot) बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्री-वेडिंग शूट वधू-वरांचे नाते बिघडवते. त्याचबरोबर मर्यादांची सीमा ओलांडणारी  ही पद्धत आहे, असं या समजानं म्हटलं आहे.

Can pre-wedding photoshoots banned?

दरम्यान,प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-wedding Photoshoot) बंद करण्याच्या प्रकरणावर वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असीम सरोदे म्हणाले, “प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालता येणार नाही. कारण ही बंदी कायद्याला धरून नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काही उपयोग नाही. प्री-वेडिंग फोटोशूट हा प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

सध्या लग्नाच्या आधी प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-wedding Photoshoot) करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. तरुण-तरुणी प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना. त्याचबरोबर हे फोटोशूट करताना तरुण-तरुणी पश्चिमात्य पद्धतीचे कपडे परिधान करतात. त्यामुळे या फोटोशूटवर बंदी घालण्याचा निर्णय अनेक समाज संस्थांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button