Crime | धक्कादायक! मटणाच्या एका तुकड्यासाठी मित्राने मित्राचा जीव घेतला

Crime | छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोण जास्त मटण खाणार? या वादावरून भयंकर प्रकार घडला आहे. या वादात मित्राने मित्राची हत्या केली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील धारला या गावात ही घटना घडली आहे. Friend killed to a friend for mutton जितेंद्र धृवे  (Jitendra Dhruve) … Read more

Published On: 

Crime | छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोण जास्त मटण खाणार? या वादावरून भयंकर प्रकार घडला आहे. या वादात मित्राने मित्राची हत्या केली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील धारला या गावात ही घटना घडली आहे.

Friend killed to a friend for mutton

जितेंद्र धृवे  (Jitendra Dhruve) आणि ओमजय सूर्यवंशी (Omjay Suryavanshi) या दोघांमध्ये मटणाचा वाद सुरू होता. या वादात ओमजयने जितेंद्रच्या डोक्यात रॉड मारली. मारहाण झाल्यानंतर जितेंद्रचा मृत्यू (Crime) झाला.

सिल्लोड तालुक्यातील धारला येथे शेतात मटणाची पार्टी सुरू होती. या पार्टीत मटन कोण जास्त खाणार? यावरून दोन मित्रांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर ओमजयने केलेल्या हल्ल्यात जितेंद्रचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे दोघे मित्र असून मध्य प्रदेशमधील आहेत. महाराष्ट्रामध्ये ते काम करण्यासाठी आले आहे.

मटन कोण जास्त खाणार? यावरून दोघात चांगलाच वाद निर्माण झाला होता. दोघेही दारूच्या नशेत असल्याने शेत मालकाने त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुद्द्यावरून दोघांचे भांडण थांबत नव्हते. संतप्त झालेल्या ओमजयने नशेत जितेंद्रवर वार केला, यातच जितेंद्रचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही