Raj Thackeray | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…

Raj Thackeray | मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार (Ajit Pawar) नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजित पवारांनी देखील राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देत निशाणा साधला होता. अशात पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टोलेबाजी केली आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या (Uddhav Thackeray) नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

Raj Thackeray’s disclosure about his relationship with Uddhav Thackeray

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे पक्ष स्थापन केला होता. मात्र, त्यानंतर देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्यात आलेली कटूता कायम आहे. दोन्ही भावांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “आधीचे आमचे खूप छान दिवस होते. आमच्यात कुणी विश कालवलं काय माहित? आमच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली आहे.”

यावेळी बोलत असताना राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीकास्त्र चालवलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहे. त्यामुळे ते इतर काही आमदार निवडून आणू शकत नाही. मात्र, मी माझा स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. त्यामधून मी 13 आमदार निवडून आणले होते. परंतु, पक्ष म्हटलं तर चढ-उतार हे आलेच. पण अजित पवार म्हणतात माझ्याकडे एकच आमदार आहे. माझ्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी आधी स्वतःच्या मुलाला निवडून आणून दाखवावे.”

Ajit Pawar comments on Raj Thackeray

“राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मिमिक्री शिवाय दुसरं काही येतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांना जनतेने कधीच नाकारलं नाही. त्यांनी 13 आमदार निवडून आणले होती. मात्र, दुसऱ्या टर्मला त्यांचा एकच आमदार निवडून आला होता.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.