Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Shambhuraj Desai | मुंबई: शिंदे गटातील काही खासदार आणि आमदार पक्षात नाराज असल्याची माहिती विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली होती. विनायक राऊत यांच्या या वक्तव्यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विनायक राऊत यांना भविष्य समजते का? त्यांना चेहऱ्यावरून भविष्य बघता येते का? असं सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला आहे.

Shambhuraj Desai warns to Vinayak Raut

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेले 9 खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तम काम करत आहोत. आम्ही उध्दव ठाकरे गटाकडे लक्ष देत नाही. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला अनेक धक्के दिले आहेत. ठाकरे गट अद्याप त्या धक्क्यातून सावरलेला नाही.”

पुढे बोलताना ते (Shambhuraj Desai) म्हणाले, “विनायक राऊत यांना मी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. त्याचबरोबर मी माझ्या कायदेशीर सल्लागारांशी बोललेलो असून त्यानुसार कारवाई करणार आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध केलेले वक्तव्य मागे घ्यावं, अन्यथा त्यांच्या विरुद्ध मी कायदेशीर कारवाई करणार आहे.”

दरम्यान, शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पंधरा दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंकडे निरोप पाठवला होता. शिंदे गटामध्ये आमची गळचेपी होत असल्याची माहिती देसाई यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिली होती. त्याचबरोबर गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) आणि तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी देखील असंतोष व्यक्त केला. शिंदे गटात गेलेल्या आमदारांची आणि खासदारांची कोंडी झाली आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला.

महत्वाच्या बातम्या