UPI Payment | यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

UPI Payment | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण यूपीआय पेमेंटला प्राधान्य देतो. यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार सोपे झाले असले, तरी अनेकदा पेमेंट करताना काही समस्या निर्माण होतात. बरेचदा यूपीआय पेमेंट केल्यानंतर पेमेंट पेंडिंग राहते. या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यूपीआय पेमेंट करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. … Read more

Published On: 

UPI Payment | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण यूपीआय पेमेंटला प्राधान्य देतो. यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार सोपे झाले असले, तरी अनेकदा पेमेंट करताना काही समस्या निर्माण होतात. बरेचदा यूपीआय पेमेंट केल्यानंतर पेमेंट पेंडिंग राहते. या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यूपीआय पेमेंट करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

What is the UPI payment limit per day?

अनेक बँकाकडून दररोजच्या पेमेंटवर मर्यादा घालण्यात आली आहे. त्याचबरोबर यूपीआय पेमेंट (UPI Payment) साठी देखील दैनंदिन मोजणीवर मर्यादा आहे. वापरकर्ते दिवसाला कमाल एक लाख रुपये हस्तांतरित करू शकतात. त्याचबरोबर दिवसातून दहा वेळा तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकतात. या मर्यादा ओलांडल्यानंतर तुम्हाला यूपीआय पेमेंट करण्यासाठी 24 तास प्रतीक्षा करावी लागते.

If UPI payment fails…

यूपीआय पेमेंट (UPI Payment) केल्यानंतर ते अयशस्वी झाल्यावर तुम्ही यूपीआय कस्टमर केअरसोबत संपर्क साधू शकतात. त्यांना तुमच्या समस्या आणि तपशीलांबद्दल माहिती दिल्यानंतर ते तुम्हाला मदत करतील.

Keep these things in mind while using UPI payments

  • यूपीआय पेमेंट (UPI Payment) करत असताना योग्य यूपीआय आयडी आणि ज्यांना पैसे द्यायचे आहे, त्यांचे नाव आणि पत्ता तपासून घ्या. योग्य ती माहिती प्रविष्ट करूनच पेमेंट करा.
  • अनेकदा बँक सर्वर डाऊन असल्यामुळे पेमेंट होत नाही. त्यामुळे इतर कोणतेही पर्याय अवलंबवण्याच्या आधी बँकेची स्थिती जाणून घ्या.
  • यूपीआय पेमेंट करण्याआधी तुमचे इंटरनेट कनेक्शन योग्यरीत्या काम करत आहे की नाही, हे तपासून घ्या. इंटरनेट कनेक्शन स्थिर नसल्यास यूपीआय पेमेंट करणे टाळा.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही