Gargi Phule | निळू फुले यांच्या मुलीचं राजकारणात पदार्पण! केला ‘या’ पक्षात प्रवेश

Gargi Phule | मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार राजकारणात पदार्पण करत आहेत. अशात निळू फुले यांची लेक गार्गी फुले हिने राजकारणात एंट्री मारली आहे. गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Nilu Phule’s daughter joins Nationalist Congress Party

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर गार्गी फुले (Gargi Phule) म्हणाल्या, “गेल्या अनेक दिवसांपासून माझी अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मला विचारणा केल्यानंतर मी लगेचच पक्ष प्रवेशासाठी हो म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारसरणी आहे, तीच माझ्या बाबांची म्हणजेच निळू फुले यांची विचारसरणी होती. माझ्या वडिलांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस न्याय देईल.”

पुढे बोलताना त्या (Gargi Phule) म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), अजित पवार यांच्यासोबत माझ्या वडिलांचे चांगले संबंध होते. पक्षासाठी काहीतरी चांगलं करण्याची माझी खूप इच्छा आहे. राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात येऊन काम करायचं मी ठरवलं आहे.”

दरम्यान, गार्गी फुले (Gargi Phule) यांनी स्त्रीमुक्त विषयात पदवी ग्रहण केली आहे. 1998 साली त्या प्रायोगिक नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीसोबत जोडल्या गेल्या. त्याचबरोबर अभिनयाचे शिक्षण त्यांनी सत्यदेव दुबे यांच्याकडे घेतलं आहे. गार्गी फुले यांनी समन्वय नाट्यसंस्थेच्या अनेक प्रायोगिक नाटकात काम केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.