Nana Patole | नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र; म्हणाले …

Nana Patole | मुंबई : सध्या आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर कर्नाटकच्या पराभवानंतर भाजपने ( BJP) आपला मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळवला आहे. यामुळे भाजपकडून ( BJP) महाराष्ट्रात 2024 साठी तयारी देखील सुरू केली असल्याचं पाहायला मिळतं. तर आता काँग्रेसचे  (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपने देशाला लुटलं : नाना पटोले

माध्यमांशी बोलताना नाना पटोले ( Nana Patole) म्हणाले की, भाजपने ( BJP) गेल्या 9 वर्षात काय – काय केलं हे त्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून सांगितलं आहे. परंतु, देशात जीएसटी आणून देशाला लुटलं किती हे मात्र देशासमोर आणलं जात नाही. तसचं जेव्हापासून जीएसटी लागू केली तेव्हापासून सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. मोदींची ( Narendra Modi) स्वतःला विश्वगुरू म्हणून घेतात. पण देशात महागाई वाढलीय,बेरोजगारी वाढलीय त्याकडे सरकारच लक्ष नाही. अशा शब्दांत नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजपवर ( BJP) टीकास्त्र सोडलं आहे.

Nana Patole Commented On Narendra Modi

दरम्यान, नाना पटोले ( Nana Patole) पुढे म्हणाले की, कधीही नोटबंदी केली जातेय. कधीही नवीन नोटा रात्रीत बाजारात आणल्या जातात. कारण मात्र काळा पैसे बाहेर निघावं म्हणून सांगितलं जातं. म्हणून खरी परिस्थिती देशाला समजली पाहिजे हे का भाजप जनतेसमोर मांडत नाही. तसचं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोकांना जीएसटीमुळे टॅक्स भरावा लागतोय. मगबतो घराला पंखा असेल किंवा कोणतीही वस्तू असेल. भाजप ( BJP) सांगते की आम्ही विकास केला परंतु, विकास करताना जनतेच्या मूळ प्रश्नाकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केलं आहे. असंही नाना पटोले ( Nana Patole) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.