Amol Kolhe | कलाकाराच्या नाव आडनावापेक्षा त्याची कला महत्त्वाची; गौतमी पाटील आडनाव वादावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

Amol Kolhe | पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचं (Gautami Patil) नाव घराघरात पोहोचलं आहे. गौतमी तिच्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. त्याचबरोबर ती तिच्या नृत्यामुळे नेहमी वादात सापडते. मात्र, यावेळी ती तिच्या नृत्यामुळे नाही, तर तिच्या आडनावामुळे चर्चेत आली आहे. गौतमीच खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. तिच्या आडनावावरून मोठा वाद निर्माण झाला असताना खासदार अमोल कोल्हे यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

Amol Kolhe’s reaction to the Gautami Patil surname controversy

अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, “आडनावावरून कलाकाराची कुचुंबना होऊ नये. कलाकाराला ट्रोल करणे हे त्याला तणावात घेऊन जातं. गौतमी या गोष्टीला अपवाद नसेल. कलाकाराच्या नाव आडनावापेक्षा त्याची कला महत्त्वाची असते. गौतमी तिच्या कर्तुत्वावर लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे तिच्या त्या कलेचा आदर व्हायला हवा.”

पुढे बोलताना ते (Amol Kolhe) म्हणाले, “ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांनी गौतमीची कला डोक्यावर घेतली आहे. तिने हे सर्व स्वबळाने मिळवलं आहे. एक काळ असा होता की ती दोन वेळच्या जेवणासाठी लढत होती. तिच्या संघर्ष काळात आज बोलणाऱ्यांनी तिला जेवण दिलं नाही. त्यामुळे फक्त आडनावावरून एका कलाकाराची कुचंबना होऊ नये.”

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) अल्पकालावधीतच आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिने क्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.