Mahakaleshwar | उज्जैन महाकाल मंदिरातील ‘या’ आकर्षक ठिकाणी भाविकांना प्रवेश बंदी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahakaleshwar | उज्जैन: उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. उज्जैनमध्ये रविवारी (28 मे) वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे महाकाल कॉरिडॉरमधील अनेक मुर्त्यांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तेथील प्रशासनाने या ठिकाणी भाविकांचा प्रवेश बंद केला आहे. त्याचबरोबर खराब झालेल्या मुर्त्या इतर ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत.

Entry of devotees banned in Ujjain Mahakal Corridor

11 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल (Mahakaleshwar) लोक कॉरिडॉरचे उद्घाटन झाले होते. कॉरिडॉरच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने मुर्त्यांचे नुकसान झाले आहे, असा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत. या प्रकरणावर आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

रविवारी मध्य प्रदेशमधील बहुतांश भागांमध्ये तुफान पाऊस झाला. या अवकाळी पावसामध्ये उज्जैनमधील महाकाल (Mahakaleshwar) कॉरिडोर भागातील अनेक मुर्त्यांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच मंदिर व्यवस्थापनाचे लोक तिथं पोहोचले. त्यानंतर लगेच दुरुस्तीचे काम सुरू झाले.

दरम्यान, उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर (Mahakaleshwar) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर कोट्यावधी लोकांचे श्रद्धा केंद्र आहे. महाकाल कॉरिडोर निर्मितीनंतर उज्जैनमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या दहा पटीने वाढली आहे. याचा परिणाम उज्जैनच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. त्यामुळे कॉरिडोरमध्ये झालेल्या नुकसानीनंतर व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या