Ajit Pawar | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार? पुण्यात चर्चांना उधाण

Ajit Pawar | पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चर्चेचा विषय आहे. तिच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली आहे. अशात विरोधी पक्ष नेते अजित पवार हे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

Will Ajit Pawar come to Gautami Patil’s program?

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य जल्लोष’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या वेळीच खेड तालुक्यामधील मोई येथे गौतमी पाटीलचाही कार्यक्रम आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील हे नाव धुमाकूळ घालत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी गौतमीला खडसावले होते. गौतमीनेही अजित पवारांना दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर बारामतीमध्ये गौतमीचा कार्यक्रम झाला होता. दरम्यान आज खेड तालुक्यात हे दोघही उपस्थित राहणार आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला अजित पवारांची उपस्थिती असेल का? याकडं सर्वांचं लक्षं लागलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचा बिहार करू नका असं छोटा पुढारी याने गौतमीला (Gautami Patil) म्हटलं होतं. मी महाराष्ट्राचा काय बिहार केला? असा प्रश्न गौतमीने उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देत छोटा पुढारी म्हणाला, “गौतमी ताईला महाराष्ट्राचा बिहार करायचा असेल तर तुम्ही बिहारमध्ये जाऊन नाचा. महाराष्ट्रामध्ये हे सर्व खपवून घेतले जाणार नाही. गौतमीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये दंगली होतात. तिच्या कार्यक्रमांमध्ये जनता पोलिसांना सुरक्षा देते.”

महत्वाच्या बातम्या

Back to top button