Dress Code In Temple | पुण्यानंतर राज्यातील ‘या’ ठिकाणच्या मंदिरात ड्रेस कोड लागू

Dress Code In Temple | टीम महाराष्ट्र देशा: काही दिवसांपूर्वी तुळजापूर मंदिर ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. मात्र, भाविकांचा विरोध असल्यामुळे हा निर्णय एका दिवसात मागे घेण्यात आला. परंतु, हे प्रकरण राज्यात चांगलंच चर्चेत आलं आहे. पुण्यातील वाघेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागपूर आणि जळगावातील मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dress code enforced in Jalgaon and Nagpur temples

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात ड्रेस कोड (Temple Dress code) लागू करण्यात आला आहे. मंदिरामध्ये शॉर्ट, स्कर्ट, पॅन्ट, वनपीस असे कपडे परिधान करणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर साडेतीन शक्तीपीठपैकी एक असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील श्री गोपाळ कृष्ण मंदिर गोरक्षण सभा (धंतोली), श्री दुर्गा माता मंदिर (हिल टॉप), हनुमान मंदिर (बेलोरी) आणि श्री बृहस्पति मंदिर (कानोलीबारा) या मंदिरामध्ये ड्रेस कोडची (Temple Dress code) सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्याचा निर्धारही महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले, मंदिरात येताना वाटेल तसे कपडे घालू नये. नेटनेटके कपडे घालावे हे मी समजू शकतो. मात्र, सर्वांना जर नीट कपडे (Temple Dress code) घालायचे असतील तर मंदिरामध्ये अर्धनग्न असलेले पुजारी वगैरे त्यांना देखील अंगात सदरा-विदरा घालायला सांगा. त्याचबरोबर त्यांनी गळ्यात माळा घालावा म्हणजे ते ओळखू येतील. पुजारीही अर्धनग्न नसतात का?”

महत्वाच्या बातम्या