MS Dhoni | चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा धोनीचं राज्य! लास्ट मॅच खेळणाऱ्या रायुडूला सोपवली ट्रॉफी, पाहा VIDEO

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni | अहमदाबाद: काल इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) चा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नईने आयपीएलचा अंतिम सामना खेळला.

MS Dhoni gave the trophy to Rayudu who played the last match

आयपीएल 2023 मध्ये चेन्नईने पाच गडी राखून विजय मिळवला. पाचव्यांदा जेतेपद मिळवून संपूर्ण संघ अत्यंत आनंदी होता. त्याचवेळी सामना संपल्यानंतर रॉजर बिन्नी आणि जय शहा यांनी कर्णधार धोनीला ट्रॉफी घेण्यासाठी बोलावलं. धोनीने (MS Dhoni) ट्रॉफी घेऊन ती लगेच अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे सोपवली. त्यानंतर त्याने संघातील युवा खेळाडू मथिश पथिरानाला ट्रॉफी दिली. त्यानंतर चेन्नईने आपला विजय साजरा केला.

https://www.instagram.com/reel/Cs18aNMg3Tw/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान, गुजरातने चेन्नईला 20 षटके खेळत 215 धावांचे लक्ष दिले होते. त्यानंतर पावसामुळे हा सामना अडीच तास थांबला होता. त्यानंतर चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष देण्यात आले. जे ड्वेन कॉनवे, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू आणि रवींद्र जडेजा यांनी या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.

महत्वाच्या बातम्या