Vinayak Raut | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत असतात. अशात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. फक्त भुंकण्यासाठी भाजपनं नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे.
Vinayak Raut criticizes Nitesh Rane
माध्यमांशी बोलताना विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, “नितेश राणे म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून चिंपाट माणूस आहे. त्याला आम्ही किंमत देत नाही. फक्त भुंकण्यासाठी त्याला भाजपनं पाळलं आहे. त्याचबरोबर भुंकणारा कुत्रा कधीच चावत नसतो.”
विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नितेश राणेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. मात्र, विनायक राऊत यांच्या या वक्तव्यावर नितेश राणे काय प्रतिक्रिया देतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान,”मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे नावाचा कावीळ झाला आहे. मोदी भक्त झालेल्या शिंदे गटाला उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. आरएसएसकडून त्यांना एक स्क्रिप्ट लिहून दिली जाते. ते वाचण्याचं काम मुख्यमंत्री करतात,” अशा खोचक शब्दात विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- Ruturaj Gaikwad | IPL जिंकताचं ऋतुराजचा मोठा खुलासा! पहिल्यांदा फोटो शेअर करत म्हणाला…
- Gautami Patil | बीडच्या पाटलाने गौतमी पाटीलला घातली लग्नाची मागणी
- Gargi Phule | निळू फुले यांच्या मुलीचं राजकारणात पदार्पण! केला ‘या’ पक्षात प्रवेश
- Gautami Patil | संभाजीराजेंचा काल गौतमीला पाठिंबा तर आज माघार; म्हणाले…
- Chennai Super Kings | CSK च्या ‘या’ दिग्गज खेळाडूंनं घेतला IPL मधून निवृत्त होण्याचा निर्णय