Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट नोंदवली जात आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अजूनही चाळिशीच्या पार आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस (Rain) धुमाकूळ घालत आहे. कोकण आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Yellow alert of rain issued in ‘these’ districts
विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस बरसत आहे. त्याचबरोबर येत्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी (Weather Update) करण्यात आला आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भामध्ये पाऊस धुमाकूळ घालत असला तरी उर्वरित राज्यात उन्हाची तीव्रता वाढली (Weather Update) आहे. मंगळवारी (30 मे) नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड आणि जालना या शहरांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक होती.
दरम्यान, साधारतः नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 01 जून असते. मात्र, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार आहे. केरळमध्ये 04 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nikhil Wagle | प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची – निखिल वागळे
- Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा
- Gautami Patil | महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण ! – संभाजीराजे
- UPI Payment | यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
- Vinayak Raut | फक्त भुंकण्यासाठी भाजपने नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं – विनायक राऊत