Gautami Patil | गौतमी पाटील करणार राजकारणात प्रवेश? गौतमीचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gautami Patil | पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. सबसे कातील, गौतमी पाटील…असं म्हणत गौतमी महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली आहे. गौतमी लावणीच्या स्टेजवरून आता राजकारणात प्रवेश करणार असल्याचे चर्चांना उधाण आलं आहे. राजकारणात प्रवेश करण्याबाबत गौतमीने मोठा खुलासा केला आहे.

Will Gautami Patil come into politics?

गौतमीच्या ‘पाटील’ आडनावावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आडनावावरून टार्गेट करणाऱ्यांना गौतमीने पुन्हा एकदा चांगलंच सुनावलं आहे. यावेळी बोलत असताना तिने राजकारणात प्रवेश करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी (Gautami Patil) म्हणाली, “मला राजकारणातलं काही कळतं नाही. त्याचबरोबर मला त्यात काही इंटरेस्ट नाही. मी राजकारणात पडणार नाही.” ही प्रतिक्रिया दिल्यानंतर तिच्या राजकीय पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

गौतमीच्या (Gautami Patil) आडनावावरून मोठा वाद निर्माण झाला असताना खासदार अमोल कोल्हे यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, “आडनावावरून कलाकाराची कुचुंबना होऊ नये. कलाकाराला ट्रोल करणे हे त्याला तणावात घेऊन जातं. गौतमी या गोष्टीला अपवाद नसेल. कलाकाराच्या नाव आडनावापेक्षा त्याची कला महत्त्वाची असते. गौतमी तिच्या कर्तुत्वावर लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे तिच्या त्या कलेचा आदर व्हायला हवा.”

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) अल्पकालावधीतच आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिने क्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.

महत्वाच्या बातम्या