Shinde Group | परभणी: शिंदे गटाने बंड केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येते. खोके मिळाले म्हणून गद्दारी केल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांवर ठाकरे गटाकडून (Thackeray group) करण्यात येतो. शिंदे गटाच्या आमदारांना चिडवण्यासाठी ठाकरे गटाकडून ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या जातात. ही गोष्ट आता फक्त शिवसेनेपर्यंत मर्यादित राहिलेली नसून गावागावात पोहोचली आहे. सोमवारी एका लग्न सोहळ्यात शिंदे गटाच्या आमदाराला ’50 खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करून डिवचण्यात आलं आहे.
50 khoke ekdm ok – Uddhav Thackeray Group
ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदार आणि खासदारांना खोक्यावरून नेहमी डिवचतं असतात. अशात परभणीतील पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी एका लग्न समारंभात आमदार संतोष बंगार यांनी हजेरी लावली होती. संतोष बंगार लग्न मंडपात पोहोचतात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाली. तेथे उपस्थित कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा सुरू झाल्या. त्यानंतर लग्न समारंभात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
The Thackeray group has irritated to the Eknath Shinde group
संतोष बंगार (Shinde Group) लग्नाला येताचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरू केल्या. यामध्ये त्यांनी ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ’50 खोके एकदम ओके’ची नारेबाजी सुरू केली. त्यानंतर बंगार यांचा चेहरा पूर्णपणे पडला होता.
दरम्यान, संतोष बंगार (Shinde Group) यांनी घोषणा देणाऱ्यांना हटकलं नाही. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना घोषणा देऊ दिल्या. मात्र, या घोषणाबाजीमुळे लग्न समारंभात अडचणी निर्माण झाल्या. वऱ्हाडी मंडळींनी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना समजावलं आणि घोषणाबाजी बंद केली.
महत्वाच्या बातम्या
- Crime | धक्कादायक! मटणाच्या एका तुकड्यासाठी मित्राने मित्राचा जीव घेतला
- Ravindra Jadeja | हृदयस्पर्शी! रवींद्र जडेजाच्या पत्नीने भर मैदानात पायाला स्पर्श करून घेतले जडेजाचे आशीर्वाद, पाहा VIDEO
- PM Kisan Yojana | सरकारची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 6000 ऐवजी 12000 रुपये
- Ravindra Jadeja | अंगावर साडी, डोक्यावर पदर रवींद्र जडेजाच्या पत्नीचं सोशल मीडियावर होतयं कौतुक
- Gautami Patil | गौतमी पाटील करणार राजकारणात प्रवेश? गौतमीचा मोठा खुलासा