Share

Ravindra Jadeja | हृदयस्पर्शी! रवींद्र जडेजाच्या पत्नीने भर मैदानात पायाला स्पर्श करून घेतले जडेजाचे आशीर्वाद, पाहा VIDEO

🕒 1 min read Ravindra Jadeja | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. जेतेपद मिळवल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपल्या परिवारासह काही खास क्षण साजरे केले. आयपीएल 2023 संपली असली, तरी त्याची काही खास क्षण अजून चर्चेत आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ravindra Jadeja | अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) चा अंतिम सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. जेतेपद मिळवल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपल्या परिवारासह काही खास क्षण साजरे केले. आयपीएल 2023 संपली असली, तरी त्याची काही खास क्षण अजून चर्चेत आहे.

Ravindra Jadeja’s wife took his blessings by touching his foot

आयपीएल 2023 ट्रॉफी जिंकल्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) त्याच्या कुटुंबासह नरेंद्र मोदी स्टेडियमवर जल्लोष साजरा करताना दिसला. हा सामना संपल्यानंतर जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने पती जडेजाच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतले. पायांना स्पर्श करणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. रिवाबा भारतीय संस्कृती जपत असल्यामुळे सोशल मीडियावर तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतं आहे.

त्याचवेळी सोशल मीडियावर रिवाबाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण जिथे इतर क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रेस आणि वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसत होत्या, तिथे रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी साडीमध्ये दिसली. रिवाबाने हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. त्याचबरोबर तिच्या डोक्यावर असलेला पदर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

दरम्यान, रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा ही आमदार आहे. तिने जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर गुजरात विधानसभा निवडणूक लढली होती. तिचा हा साधेपणा पाहून सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जात आहे. रिवाबा हिरव्या रंगाच्या सिम्पल साडीमध्ये दिसली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही