Gautami Patil | “त्यात माझा काय दोष…”; आयोजकांवर गुन्हे दाखल प्रकरणी गौतमीची प्रतिक्रिया

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. गौतमी तिच्या डान्स, कार्यक्रमाला होणारे वाद आणि आडनावावरून वादात सापडली आहे. गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या दंगलींमुळे आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहे. या सर्व प्रकरणावर गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांचा आणि माझा काही संबंध नसतो, असं ती यावेळी बोलताना म्हणाली.

Gautami Patil said about filing a case against the organizers of the event

गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कारण तिच्या कार्यक्रमांमध्ये मारामारी आणि राडे होतात. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गौतमी पाटील म्हणाली, “कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल होतात, त्यात माझा काही दोष नसतो. मात्र, तरीपण गौतमी पाटील हे नाव पुढे येतं. कार्यक्रमाच्या आयोजकांचा आणि माझा काही संबंध नसतो.”

दरम्यान, गौतमी पाटीलने राजकारणात प्रवेश करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी (Gautami Patil) म्हणाली, “मला राजकारणातलं काही कळतं नाही. त्याचबरोबर मला त्यात काही इंटरेस्ट नाही. मी राजकारणात पडणार नाही.” ही प्रतिक्रिया दिल्यानंतर तिच्या राजकीय पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) अल्पकालावधीतच आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिने क्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.

महत्वाच्या बातम्या

Back to top button