Gautami Patil | जळगाव: सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. गौतमी तिच्या नृत्याने सर्वांना घायाळ करते. गौतमी अश्लील हाव-भाव करत डान्स करते, असा तिच्यावर आरोप केला जातो. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून करण्यात येते.
गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. मी पाटील आहे, तर पाटीलच आडनाव लावणार अशा शब्दात गौतमीने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं होतं. आडनाव वादानंतर गौतमीच्या नावाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. गौतमीच्या वडिलांनी तिच्या खऱ्या नावाबद्दल माहिती दिली आहे.
Vaishnavi is a Gautami Patil real name
रवींद्र पाटील हे गौतमीचे (Gautami Patil) वडील असून त्यांनी तिच्या नावाबद्दल माहिती दिली आहे. शाळेतल्या दाखल्यावर तिचं नाव गौतमी पाटील असून तिचं जन्म नाव वैष्णवी आहे, असं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे.
दरम्यान, त्यांना गौतमीचा (Gautami Patil) डान्स आवडतो का? याबद्दल तिच्या वडिलांनी मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “माझ्या घरी टीव्ही नाही. दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये तिचा डान्स बघितला आहे. मला तिचा डान्स आवडतो. मात्र, मला थोडं वाईटही वाटतं. कारण तिच्या डान्सवर सातत्याने टीका होत असते.”
महत्वाच्या बातम्या
- WTC Final | पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण ठरणार वर्ल्ड चॅम्पियन? जाणून घ्या
- Sanjay Raut | शिवसैनिकांचं संजय राऊतांविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन! नक्की काय आहे प्रकरण?
- Weather Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागांत उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज
- Gas Cylinder | आनंदाची बातमी! गॅस सिलेंडरचे दर पुन्हा बदलले, जाणून घ्या किमती
- Thackeray Group | शिंदेंना मोठा झटका! शिंदेंना हरवण्यासाठी ठाकरेंनी मैदानात उतरवला ‘हा’ जुना शिलेदार