Share

Gautami Patil | गौतमीसोबत तिच्या आईचा व्हिडिओ व्हायरल! पाहा VIDEO

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. गौतमी तिच्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. त्याचबरोबर ती तिच्या नृत्यामुळे कायम वादात सापडते. मात्र, टीकाकारांनी कितीही टीका केली, तरी माझी आई माझ्या कायम सोबत आहे, असं गौतमी नेहमी म्हणतं असते. त्यामुळे तिच्या आईबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाली आहे. … Read more

Published On: 

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. गौतमी तिच्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. त्याचबरोबर ती तिच्या नृत्यामुळे कायम वादात सापडते. मात्र, टीकाकारांनी कितीही टीका केली, तरी माझी आई माझ्या कायम सोबत आहे, असं गौतमी नेहमी म्हणतं असते. त्यामुळे तिच्या आईबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाली आहे.

Gautami Patil’s mother’s video is going viral on social media

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil)  हिच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीने तिच्या आईसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये गौतमी तिच्या आईसोबत दिसली आहे.

गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आईचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ @gautamipatilkalakaar या इन्स्टा हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये गौतमीचा फॅन तिच्या आईसाठी चारोळी म्हणताना दिसत आहे. ‘गौतमीला जन्म देणारी धन्य ती माऊली’ असं त्यानं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) चा जन्म झाला तेव्हा आईला वडिलांपासून त्रास सुरूच होता. शेवटी नवऱ्याला कंटाळून गौतमीची आई तिला घेऊन मामाकडे पुण्याला जाऊन राहायला लागली. गौतमीचे शिक्षण पुण्यात झालं आहे. गौतमीच्या वडिलांचं दारूचं व्यसन दिवसेंदिवस वाढत होतं. त्यामुळे गौतमीने आणि तिच्या आईने त्यांच्याशी कायमचे संबंध तोडले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही