Share

Eknath Shinde | बोगस विक्रेत्यांवर धाडी टाकाच; अब्दुल सत्तारांच्या घोटाळेबाज धाडीवर काय कारवाई करणार

🕒 1 min readEknath Shinde | मुंबई: बोगस बियाणे विक्रेत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बोगस बियाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोगस बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. राज्यात अनेक ठिकाणी बोगस … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई: बोगस बियाणे विक्रेत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बोगस बियाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोगस बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाणे विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात पथके तयार करून काटेकोरपणे छापे टाकण्याची निर्देश मुख्य सचिवांना दिले आहे.

Abdul Sattar is caught in the fake seed sale case

बोगस बियाणे विक्री प्रकरणामध्ये राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार सापडले आहे. एका खत कंपनीत कृषी विभागाच्या कथित पथकाने टाकलेल्या धडकेमुळे अब्दुल सत्तार वादात सापडले आहे. या पथकामध्ये असलेला दीपक गवळी हा माझा स्वीय सहायक नाही, अशी प्रतिक्रिया सत्तरांनी दिली होती. मात्र, काही दिवसानंतर एका शासकीय दौऱ्यामध्ये त्यांनी दीपक गवळीचा स्वीय सहाय्यक म्हणून उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तारांवर निशाणा साधला.

NCP’s Tweet on Abdul Sattar

अब्दुल सत्तारांची ख्याती, सदैव चर्चेत राहती
राज्याचे कृषिमंत्री आणि घोटाळ्यांचे घनिष्ट नाते काही संपेना..

कधी सरकारी अधिकाऱ्यांना दारुची ऑफर, कधी घोटाळ्यांचे आरोप, कधी महिलांचा अवमान अशा एक ना अनेक प्रकरणात मंत्री अब्दुल सत्तार अग्रस्थानी असतात. चुकीच्या कारणांसाठी चर्चेत राहण्याची कला त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी निगडीत एका प्रकरणाचा नुकताच सविस्तर आराखडा मांडला आहे. सत्तार यांच्या स्वीय सहाय्यकाकडून करण्यात आलेल्या घोटाळेबाज धाडीचे प्रकरण एबीपी माझाने उघड केले आहे. ईडी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तारांनी हे प्रकरण झाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र कोंबडं कितीही झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही, हे सत्तार विसरलेले दिसतात. आता ही धाड स्वीय सहाय्यकांनी कोणाच्या सांगण्यावरून केली असावी हा प्रश्न उपस्थितीत होतोय, त्याची स्पष्टता ईडी सरकारकडून मिळेल का?

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!