Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल होणार आहे. पुढील 48 तासांत राज्यातील काही भागांमध्ये मान्सून (Monsoon) दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
Chance of heavy rain in the state
राज्यात पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे.
राज्यात नाशिक, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात झाली आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये 15 जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update दिला आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळे 14 आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील जामनगर, पोरबंदर, राजकोट, जुनागड, द्वारका या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम अधिक प्रमाणत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Twitter India | शेतकरी आंदोलनाच्या बातम्या दडपण्यासाठी भाजपने ट्विटरवर दबाव टाकला
- Athwani Movie Poster | प्रेम जितकं जुनं होत जातं, तितकं मुरत जातं… ‘आठवणी’ चे पोस्टर रिलीज
- Mukund Kirdat | वारकऱ्यांवर लाठीमार हे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना त्रास देणाऱ्या मानसिकतेचे प्रतिबिंब: मुकुंद किर्दत, आप
- World Cup 2023 | वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक जाहीर! IND vs Pak सामना कधी आहे? जाणून घ्या
- Indian Army | पत्नीला अर्धनग्न अवस्थेत 120 लोकांनी बेदम मारहाण केली; भारतीय लष्कराच्या जवानाचा आरोप