Indian Army | पत्नीला अर्धनग्न अवस्थेत 120 लोकांनी बेदम मारहाण केली; भारतीय लष्कराच्या जवानाचा आरोप

Indian Army | तामिळनाडू: तमिळनाडू राज्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील भारतीय लष्कराच्या जवानाने एक गंभीर आरोप केला आहे. माझ्या पत्नीला अर्धनग्न अवस्थेत 120 लोकांनी मारहाण केल्याचा आरोप या भारतीय सैन्यातील जवानाने केला आहे. भारतीय लष्करातील अधिकारी लेफ्टनंट कर्नल एन त्यागराजन यांनी या जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील लष्कराच्या जवानाचे (Indian Army) नाव हवालदार प्रभाकर आहे. ते तामिळनाडू राज्यातील रहिवासी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “एका लीजवर घेतलेल्या जागेवर त्यांची पत्नी दुकान चालवते. त्या ठिकाणी 120 लोकांनी तिच्यावर मारहाण केली आहे.”

My family has been attacked – Indian Army Soldiers

“त्या लोकांनी चाकूने माझ्या कुटुंबावर हल्ला केला आहे आणि धमकी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी माझ्या पत्नीला अर्धनग्न अवस्थेत मारहाण केली आहे”, असही तो जवान म्हणाला. या घटनेनंतर जवानाने एसपीकडे तक्रार दाखल केलेली असून त्या व्यक्तीवर कारवाई करायची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्याने डीजीपीकडे देखील मदत मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या