Chandrashekhar Bawankule | भाजप शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांची हकालपट्टी करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

Chandrashekhar Bawankule | मुंबई: सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे-फडणीस सरकारमधील शिंदे गटातील पाच मंत्र्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

bjp does not interfere with anyone’s rights

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले (Chandrashekhar Bawankule), “मी 32 वर्षापासून भाजपासोबत काम करत आहे. भारतीय जनता पक्ष कोणाच्याही अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे कुणाला कोणत मंत्रिपद द्यायचं? हा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दोन्ही पक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. भाजपचे निर्णय भाजप मंत्री ठरवतात आणि शिंदे गटातील निर्णय एकनाथ शिंदे ठरवतात. त्यामुळे आमच्यात कुणी भांडण लावू नये.”

दरम्यान, ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी या विषयावर भाष्य केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं होतं. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जागावाटप मुद्द्यावरून वाद होत असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून खासदार पदाचा राजीनामा देण्याचं वक्तव्य केलं होतं. श्रीकांत शिंदे यांची ही व्हिडिओ पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. श्रीकांत शिंदे यांच्या या पोस्टनंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये खरंच काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा उधाण आलं होतं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.