Warkari Lathi Charge । वारकऱ्यांवर लाठीमार करण्याची हिम्मत होतेच कशी? शिंदे – फडणवीसांचा हिंदुत्वाचा बुरखा टरा टरा फाटला

Alandi Warkari Lathi Charge पुणे – ‘वारकऱ्यांवरील हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरील आणि अस्मितेवरील हल्ला आहे. पंढरीच्या वारीचा संपूर्ण जगात सन्मान केला जातो. नियोजन, संयम, शांतता आणि शिस्त असणाऱ्या वारीवर आत्तापर्यंत असं संकट कधी आलं नव्हतं. शिंदे – फडणवीसांना विठ्ठलाची महापूजा करण्याचा अधिकार नाही. सरकारने आधी वारकऱ्यांची आणि महाराष्ट्राची माफी मागायला हवी. वारकऱ्यांवरील हल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत निर्घृण प्रकार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात ४७ दिंड्यांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली होती. यातील प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना प्रवेश दिला गेला आहे. दरम्यान, पोलिस आणि वारकरी यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी आम्हाला का मारले याचे उत्तर द्यावे 

मारहाण झालेल्या या वारकऱ्याचा व्हिडिओ हायरल होत आहे. जवळपास १५ ते २० पोलिसांनी चार वारकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप विशाल रावसाहेब पाटील या तरुण वारकऱ्याचे केला आहे. “पोलिसांनी आम्हाला का मारले याचे उत्तर द्यावे,” अशी मागणी विशाल पाटील याने केली आहे. ”

वारकऱ्यांची माफी मागा, अन्यथा पंढरपूरमध्ये पाय ठेऊ नका -संजय राऊत

इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर निर्घृण लाठीमार झाला, त्याचा आम्ही निषेध करतो. ज्याप्रमाणे कालचे चित्र होते ते पाहता पोलिसांमध्ये औरंगजेब संचारला होता. ‘महाराष्ट्रात औरंग्याची अवलाद कशी निर्माण झाली?’ असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो. आम्ही ती काल पहिली तीही तुमच्याच राजवटीत. याला पूर्णपणे भाजपच जबाबदार आहे.

आळंदीमध्ये पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता

आळंदीच्या वारीचं नियंत्रण राजकीयदृष्ट्या आपल्या हातात असावं, देवळात कोणी व किती लोकांनी जावं याचं राजकीय नियंत्रण भाजपचे काही बोगस ‘आचार्य- प्राचार्य’ तिथे बसून करत होते. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये वाद झाला. शेवटी ती परंपरा संस्कृती वारकऱ्यांची आहे, राजकीय टग्यांची नाही. पोलीस वारकऱ्यांना बेदमपणे मारताना दिसत आहेत, ते कोणीच नाकारू शकत नाही.

वैदिक ब्राम्हण्यवादी वर्ग हा नेहमीच संत परंपरेचा दुश्मन- प्रकाश आंबेडकर 

वारकर्यांवर लाठीचार्ज  करणाऱ्या पोलीस प्रशासनाला प्रकाश आंबेडकर यांनी धारेवर धरले आहे; ते म्हणाले इतिहासात पहिल्यांदाच वारकर्यांवर लाठीचार्ज करण्याची घटना घडली. शिस्तप्रिय आणि कोणाला त्रास न देता निघणाऱ्या वारीवर हल्ला करणं हे कोणत्या मानसिकतेचे द्योतक आहे? वैदिक ब्राम्हण्यवादी वर्ग हा नेहमीच संत परंपरेचा दुश्मन राहिलेला आहे. संत परंपरेला नेहमीच संपवण्याचे काम वैदिकांनी केले आहे. वारकर्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा आम्ही पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करतो.

हिंदुत्वाचा आक्रोश करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? – संजय राऊत 

 

वारकऱ्यांवरील हल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत निर्घृण प्रकार आहे. या हल्ल्याचं प्रायश्चित्त कोण घेणार? कुठे आहेत तुमचे धर्माभिमानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? हिंदुत्वाचा आक्रोश करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे लोकं कुठे आहेत? वारकऱ्यांवरील हल्ला हा हिंदुत्वावरील हल्ला नाही का? आता हिम्मत असेल तर सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढा. त्र्यंबकेश्वरला तणाव निर्माण करायला घुसलेली टोळीच आळंदीमध्ये होती. धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रामध्ये भाजपने काही गंध नसताना अशा टोळ्या निर्माण केल्या आहेत. हे टोळ भैरव घुसतात आणि मंदिरांचा ताबा घेतात. वारकऱ्यांचा आणि अध्यात्मिक पीठांचा ताबा घेतात. वारकऱ्यांवरील हल्ला हा त्याचा परिणाम आहे.

पोलिसांनी लाठीमार किंवा बळाचा वापर केलेला नाही – पोलिस आयुक्त

‘पालखी प्रस्थान सोहळ्यात गेल्या वर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाल्याने काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही स्थानिक युवकांनी मंदिरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांशी किरकोळ झटापट झाली. पोलिसांनी लाठीमार किंवा बळाचा वापर केलेला नाही,’ असा दावा पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.