Sharad Pawar | पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शरद पवार यांना धमकी मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
Sharad Pawar was threatened by the Facebook page ‘Narmadabai Patwardhan’
शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या फेसबुक पेजवरून धमकी देण्यात आली होती. पुण्यातील आयटी इंजिनिअर सागर बर्वे (Sagar Barve) नावाचा तरुण हे फेसबुक पेज चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. सागर बर्वे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयानं 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सागर बर्वे सोबतच अमरावतीच्या सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) या तरुणांने ट्विटरवरून शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह पोस्ट केली होती. सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणावर तपास सुरू केला आहे.
दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली होती. सौरभ पिंपळकर या व्यक्तीनं शरद पवारांना धमकी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. सौरभ पिंपळकर हा अमरावती भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी पवारांविरोधात हा डाव आखला होता का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- MHT CET Result | आज जाहीर होणार CET निकाल! केव्हा आणि कुठे बघायचा? जाणून घ्या
- Nana Patole | दंगेखोरांना सोडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध – नाना पटोले
- Weather Update | नागरिकांनो सावधान! बिपरजॉय चक्रीवादळामुळे ‘या’ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
- Sanjay Raut | आम्ही कुणाचे वकीलपत्र घेतले नाही, पक्षाने अन्याय केला असेल तर…; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
- Sharad Pawar | “… म्हणून अजित पवारांना पद दिलं नाही”; शरद पवारांची महत्वाची प्रतिक्रिया