Sharad Pawar | “… म्हणून अजित पवारांना पद दिलं नाही”; शरद पवारांची महत्वाची प्रतिक्रिया

Sharad Pawar | दिल्ली: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पवारांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) यांना राष्ट्रवादीत कोणतेही प्रकारचं पद मिळालेलं नाही. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar already has a huge responsibility – Sharad Pawar

अजित पवार यांना पद का दिलं नाही? यावर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहे. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर आधीपासूनच खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणून त्यांना पक्षात कोणतेही पद देण्यात आलेले नाही. पक्षाच्या या निर्णयावर अजित पवार अजिबात नाराज नाही.”

पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम वाढवायचं आहे. त्यामुळे पक्षातील नवीन सहकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहे.”

“एका व्यक्तीला देश सांभाळणे कठीण गेले असते. त्याचबरोबर निवडणुकीसाठी आता वर्षापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे कार्याध्यक्षपदी दोन नेत्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे”, असही ते (Sharad Pawar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.