Cabinet Expansion | संदीपान भूमरेंनी उद्धव ठाकरेंचा बाप कोण विचारले; भाजपने भूमरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीचा निर्णय घेतला

Cabinet Expansion | मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होताना दिसून येत आहे. भाजपचे नेते शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांचा ‘गद्दार’ व ‘खोके बहाद्दर’ असा उल्लेख करत आहेत. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा भाजपच्या वतीने गद्दार असा उल्लेख करणारी पोस्ट व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि भाजपमध्ये देखील वादाची ठिणगी पडली आहे. त्यावरून श्रीकांत शिंदेनी थेट कल्याण मधून राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.

भाजपकडून शिंदे गटाचा ‘गद्दार’ व ‘खोके बहाद्दर’ असा उल्लेख केला जात आहे. त्यावर शिवसेना शिंदे गट शांत आहे. भाजपकडून शिंदे गटाला चांगलेच झटके मिळायला सुरवात झाली आहे. एकनाथ शिंदेचे प्रमुख ५ शिलेदारांना मंत्रिमंडळातून हकालपट्टीचा करण्याचा सज्जड दम भाजपने शिंदेना दिलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पाच मंत्र्यांची प्रतिमा जनतेमध्ये खराब असल्याचं भाजपने एका अहवालामध्ये सांगितलं आहे. या मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान दिल्यास भाजपला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या मंत्र्यांना मंत्रीपद (Cabinet Expansion) देण्यात येणार नाही, असंही या अहवालात म्हटलं असल्याची माहिती मिळाली आहे. या पाच मंत्र्यांमध्ये संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा देखील समावेश आहे.

BJP decided to expel Sandipan Bhumre from the cabinet

संदिपान भुमरे यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंचा बाप कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना घरचा रस्ता (Cabinet Expansion) दाखवण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

Who is Uddhav Thackeray father – mother? – Sandipan Bhumre

माध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरेचा बाप कोण? असा प्रश्न संदिपान भुमरे यांनी विचारला होता. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) का गेले होते सोनिया गांधींना (Sonia Gandhi) भेटायला? त्यांचा बाप कोण आहे? त्यांची आई कोण आहे? ते का जातात मग त्यांना भेटायला? ते शरद पवारांना भेटायला जातात. मग शरद पवार (Sharad Pawar) त्यांचे बाप आहे का? संजय राऊत यांनी आमचा बाप काढू नये.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.