Share

Dress Code In Temple | राज्यातील 144 मंदिरात ड्रेस कोड लागू; मंदिर महासंघाने दिली माहिती

Dress Code In Temple | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव आणि नागपूर जिल्ह्यातील मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता राज्यातील एकूण 114 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. Dress code enforced in 18 temples … Read more

Published On: 

Dress Code In Temple | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव आणि नागपूर जिल्ह्यातील मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता राज्यातील एकूण 114 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

Dress code enforced in 18 temples in Konkan

महाराष्ट्र मंदिर समितीने मंदिरात ड्रेस कोड (Dress Code In Temple) लागू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल 114 मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जळगाव, अकोला, नागपूर, धुळे, अमरावती, नाशिक आणि कोकणातील एकूण 114 मंदिर आहेत. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील 18 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.

जळगाव शहरातील ओंकारेश्वर मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, शनी मंदिर, शिवधाम मंदिर, इच्छा देवी मंदिर, कालिका माता मंदिर, अष्टभुजा मंदिर, विनायक मंदिर, सूर्यमुखी हनुमान मंदिर, साई मंदिर इत्यादी मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू (Dress Code In Temple) करण्यात येणार आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा परिसरातील पद्मालय देवस्थान (एरंडोल), कष्टभंजन देव मंदिर (सूनसावखेडा), श्रीराम मंदिर (पारोळा), उमामेश्वर मंदिर (उमाळे), गजानन महाराज मंदिर (बांभोरी), भवानी माता मंदिर (रावेर) या ठिकाणी देखील ड्रेस कोड लागू (Dress Code In Temple) करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install