Share

Ajit Pawar | राष्ट्रवादीत अजित पवारांना डच्चू! तर पवारांनी लेकीला दिली मोठी जबाबदारी

🕒 1 min readAjit Pawar |  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar |  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.

Supriya Sule and Praful Patel as working president of NCP

माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांवर असणार आहे.

राष्ट्रवादीत अजित पवार साईड ट्रॅकवर गेले काय?

सध्या अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीत अजित पवार साईड ट्रॅकवर गेले काय? अशा चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार यांनी अचानक घोषणा केल्यामुळे या घोषणा म्हणजे धक्कातंत्राचा भाग असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!