Sanjay Raut | एकनाथ शिंदे गटानं नाही तर ‘या’ व्यक्तीनं फोडली शिवसेना; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना फुटण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट का पडले? याबाबत राऊतांनी धक्कादायक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नाही तर दिल्लीतील भाजप नेत्यांनी शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. Shivsena has split because of Amit Shah माध्यमांशी … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना फुटण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट का पडले? याबाबत राऊतांनी धक्कादायक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नाही तर दिल्लीतील भाजप नेत्यांनी शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Shivsena has split because of Amit Shah

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे शिवसेना फुटली नाही. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यामुळे शिवसेना फुटली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई कमजोर करण्यासाठी त्यांनी हा डाव आखला होता. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून त्यांनी हे सर्व केलं आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “शिवसेना सोडून जाणाऱ्या 12 ते 13 आमदारांवर ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू होती. याच गोष्टीचा फायदा घेऊन अमित शहा यांनी शिवसेना पक्ष फोडला आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचलं होतं. त्याचबरोबर मराठी माणसाचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी हे केलं आहे.”

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. अशात संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपानंतर राज्यात पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. राऊतांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही