Weather Update | कुठे तीव्र ऊन तर कुठे मुसळधार पाऊस, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) सक्रिय आहे. या चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांश भागात पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता (Heat wave) वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Heat wave in Vidarbha and Madhya Maharashtra

राज्यात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून देण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), अरबी समुद्रामध्ये सक्रिय असलेलं बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biperjoy) आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. पुढील 2 दिवसांमध्ये हे चक्रीवादळ उत्तर भारताकडे सरकणार असल्याची माहिती हवामान खात्याने (Weather Update) दिली आहे.

दरम्यान, केरळमध्ये साधारण 1 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता असते. मात्र, यावर्षी मान्सून केरळमध्ये 8 जून रोजी दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यात 18 जून पर्यंत मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त (Weather Update) केली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.