Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biperjoy) वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होताना दिसत आहे. अशात चक्रीवादळाबद्दल हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून पुढे सरकले आहे. मुंबईनंतर हे चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे या भागात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
Heavy rain in coastal areas
बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज उत्तर कोकण आणि मुंबई किनारपट्टी लगतच्या भागात वाऱ्याचा वेग अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमध्ये पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे.
14 आणि 15 जून दरम्यान या चक्रीवादळामुळे गुजरातमधील जामनगर, पोरबंदर, राजकोट, जुनागड, द्वारका या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम अधिक प्रमाणत दिसणार आहे.
Monsoon has entered the state
दरम्यान, राज्यामध्ये रविवारी (11 जुन) मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनने दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणाचा काही भाग व्यापला आहे. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील मान्सूनचा आगमन झाला आहे. राज्याच्या उर्वरित भागात लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Update) वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | आम्ही कुणाचे वकीलपत्र घेतले नाही, पक्षाने अन्याय केला असेल तर…; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
- Sharad Pawar | “… म्हणून अजित पवारांना पद दिलं नाही”; शरद पवारांची महत्वाची प्रतिक्रिया
- Jayant Patil | अजित पवारांवर अन्याय झाला? जयंत पाटील म्हणाले…
- Sanjay Raut | “कुणावर अन्याय झाला असेल तर…”; संजय राऊतांचं अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य
- Ajit Pawar | राष्ट्रवादीत अजित पवारांना डच्चू! तर पवारांनी लेकीला दिली मोठी जबाबदारी