Share

Nana Patole | दंगेखोरांना सोडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध – नाना पटोले

Nana Patole | आळंदी: काल (11 जुन) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा सुरू असताना काही पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis government) निषेध केला … Read more

Published On: 

Nana Patole | आळंदी: काल (11 जुन) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा सुरू असताना काही पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis government) निषेध केला आहे.

The Shinde-Fadnavis government has attacked the Warkari Sampraday

शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “शेकडो वर्ष जुन्या या परंपरेवर शिंदे-फडणवीस सरकारनं हल्लाबोल केला आहे. काल सर्वसामान्य वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. या सर्व घटनेचा आम्ही काँग्रेस पक्ष निषेध करत आहोत.”

पुढे बोलताना ते (Nana Patole) म्हणाले, “वारी या परंपरेनं महाराष्ट्रासाठी खूप काही केलं आहे. याच परंपरेनं समाजाला व्यसनमुक्त बनवलं आहे. जातिवाद करणाऱ्या या सरकारनं ही परंपरा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या सरकारचा धिक्कार करतो. या सरकारमध्ये थोडी जरी लाज उरली असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा.”

दरम्यान, काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी आळंदीत उपस्थित होते. मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील फक्त 75 वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, असं आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी ठरवलं होतं. यासाठी योगेश देसाई यांनी दिंडी मालकांना विनंती केली होती. मात्र, काही वारकऱ्यांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही