Supriya Sule | मला आमची ही घराणेशाही मान्य आहे – सुप्रिया सुळे

Supriya Sule | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घराणेशाही सुरू आहे, असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला. त्यांच्या या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे.

I agree with Sharad Pawar’s dynasticism

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “शरद पवारांची ही घराणेशाही मला मान्य आहे. ज्या पक्षातील लोकांकडून हा आरोप केला जात आहे त्या पक्षाची घराणेशाही मी कधीच संसदेमध्ये दाखवून दिली होती. त्यामुळे ते जेव्हा माझ्याकडे एक बोट दाखवतात तेव्हा बाकीचे तीन बोट त्यांच्याकडे असतात.”

पुढे बोलताना त्या (Supriya Sule) म्हणाल्या, “मला उत्कृष्ट संसदरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मी शरद पवार यांची मुलगी आहे, म्हणून मला हा सन्मान मिळालेला नाही. संसदेमध्ये केलेल्या कामामुळे मला हा पुरस्कार देण्यात आला आहे. भाजप हा विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधकांना संपवण्याआधी भाजपने त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना संपवलं आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या