Share

Asaduddin Owaisi | “माझं मुघलांवर प्रेम…”; असदुद्दीन ओवैसी यांचं खळबळ जनक वक्तव्य

Asaduddin Owaisi | टीम महाराष्ट्र देशा: औरंगजेब आणि टिपू सुलतान या दोन्ही मुद्द्यावरून देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावर औरंगजेबाचे फोटो पोस्ट केल्यामुळे महाराष्ट्रात दंगली झाल्या. त्याचबरोबर टिपू सुलतानच्या वादावरून राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. India’s history is being changed या … Read more

Published On: 

Asaduddin Owaisi | टीम महाराष्ट्र देशा: औरंगजेब आणि टिपू सुलतान या दोन्ही मुद्द्यावरून देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावर औरंगजेबाचे फोटो पोस्ट केल्यामुळे महाराष्ट्रात दंगली झाल्या. त्याचबरोबर टिपू सुलतानच्या वादावरून राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

India’s history is being changed

या मुद्द्यांवर भाष्य करत असतात असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “औरंगजेब आणि मुघलांवर माझं प्रेम नाही. औरंगजेबाचा मृत्यू 300 वर्षांपूर्वी झाला आहे. त्यामुळे तुम्हाला कसं माहित? हा फोटो औरंगजेबाचाच आहे.”

पुढे बोलताना ते (Asaduddin Owaisi) म्हणाले, “बाबरी मशिदीचा प्रकरण सुरू असताना लोक आम्हाला बाबरच्या औलादी म्हणायचे. आता ही लोक आम्हाला औरंगजेबाचे औलादी म्हणतं आहे. भारतामध्ये इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदींनी लाल किल्ला बांधला आहे, असं वाटू लागलं आहे.”

“1930 साली जर्मनीमध्ये जे घडलं ते सध्या भारतात घडत आहे. जर्मनीमध्ये ज्या प्रकारे ज्यू लोकांविरोधात द्वेष पसरवला जात होता, तोच प्रकार भारतात घडताना दिसत आहे, असही ते (Asaduddin Owaisi) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही