Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा झटका! ‘त्या’ वक्तव्यामुळे महाराजांवर गुन्हा दाखल

Indurikar Maharaj | छत्रपती संभाजीनगर: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांना त्यांचं वक्तव्य महाग पडलं आहे. त्यांच्या एका वक्तव्यामुळे कोर्टाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय दिला आहे.

Indurikar Maharaj made a statement on gender discrimination in a kirtan

कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी एका कीर्तनातून लिंगभेदावर वक्तव्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला शरीरसंबंध झाल्यावर मुलगा/मुलगी होत असल्याचं, ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोर्टाने आज यावर निर्णय दिला आहे.

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) कोर्टाने दिला आहे. इंदुरीकर महाराजांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सेशन कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळली होती.

दरम्यान, इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी शरीर संबंधांवर भाष्य केलं होतं. सम तारखेला शरीरसंबंध झाल्यास मुलगा आणि विषम तारखेला शरीरसंबंध झाल्यास मुलगी होते, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे चर्चांना उधाण आलं होतं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.