Sanjay Raut | फेविकॉल आहे की मधाचे चार थेंब, हे बघावं लागेल – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवर भाष्य केलं. जिवा-भावाची आमची ही मैत्री आहे. ये फेविकॉल का जोड है तुटेगा नही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chief Minister Eknath Shinde cannot take any decision in his own way – Sanjay Raut

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खुळखुळा झाला आहे. ते त्यांच्या पद्धतीने कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. राज्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आणि मंत्रिमंडळ विस्ताराचे अधिकार त्यांच्या हातात नाही. भ्रष्ट मंत्र्यांना बाहेर काढा आणि मग मंत्रिमंडळ विस्तार करा, असा त्यांना आदेश दिलेला आहे.”

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमची जोडी म्हणजे फेविकॉल का जोड आहे, असं म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “फेविकॉल आहे की मधाचे चार थेंब ते बघावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवक्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बेडकाची उपमा दिली होती. मग हा फेविकॉलचा जोड आहे असं म्हणायचं का? काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांकडे बघत नव्हते. मग कसला हा फेविकॉलचा जोड? काही फेविकॉलचा जोड वगैरे नाहीये.”

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवर भाष्य केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “देवेंद्रजींची आणि माझी मैत्री काही आत्ताची नाही. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून आमची ही मैत्री आहे. आम्ही दोघेही आमदार होतो, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. जिवा-भावाची आमची ही मैत्री आहे. ये फेविकॉल का जोड है तुटेगा नही.”

महत्वाच्या बातम्या