Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुरू असलेल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. देवेंद्रजींची आणि आमची जिवा-भावाची मैत्री आहे. ये फेविकॉल का जोड है तुटेगा नही, असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.
Anil Bonde criticizes Eknath Shinde
भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बेडकाची उपमा दिली होती. बेडूक कितीही फुगलं तरी हत्ती बनू शकत नाही, असं ते म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे.
Amol Mitkari’s tweet on Shinde-Fadnavis
पण फेविकॉलच्या जाहिरातीत दोन हत्ती असतात,(बेडूक नसतात) त्या अनिल बोंडेबुवाना देवेंद्र जी व शिंदे गटाने सांगायला हवं.
पण फेविकॉलच्या जाहिरातीत दोन हत्ती असतात,(बेडूक नसतात ) त्या अनिल बोंडेबुवाना देवेंद्र जी व शिंदे गटाने सांगायला हवं 😄 pic.twitter.com/srNXsipo0p
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 15, 2023
Yeh fevicol ka jod hai tutega nahi – Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “देवेंद्रजींची आणि माझी मैत्री काही आत्ताची नाही. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून आमची ही मैत्री आहे. आम्ही दोघेही आमदार होतो, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. जिवा-भावाची आमची ही मैत्री आहे. ये फेविकॉल का जोड है तुटेगा नही.”
Our government is stronger than Mahavikas Aghadi – Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या आणि मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या मैत्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीपेक्षा जास्त मजबूत आमचं सरकार आहे. कोणत्याही जाहिरातीमुळे आमच्यात वाद होईल इतकं तकलादू सरकार आमचं नाही.” “मागचं सरकार म्हणजे आपल्या घरी आणि आत्ताच सरकार म्हणजे आपल्या दारी. हा महत्त्वाचा फरक दोन्ही सरकारमध्ये आहे. आधीच सरकार घरी बसून होतं. मात्र, आताचं सरकार तुमच्या दरी येऊन तुम्हाला तुमचे अधिकार मिळवून देईल”, असही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Asia Cup | आशिया कपचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ ठिकाणी होणार सामने
- Eknath Shinde | ‘फेविकॉल का जोड है तुटेगा नही’ एकनाथ शिंदे, तर फडणवीस म्हणतात ‘इतकं तकलादू सरकार आमचं नाही’
- Chitra Wagh | “मोठ्या ताई अफवा पसरवू नका, काविळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं तसं तुमचं..”; चित्रा वाघांची सुप्रिया सुळेंवर टीका
- Abdul Sattar | कृषी महामंडळात 150 कोटींचा घोटाळा; दैनिक सामनातून अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप
- Sharad Pawar – शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांचा BRS पक्षात प्रवेश