🕒 1 min read
Chitra Wagh | मुंबई: मुंबई लोकलमध्ये चालू गाडीत महिला डब्यात तरुणीवर बलात्कार झाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून दिली होती. त्याचबरोबर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती, असं चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
Chitra Wagh Tweet on Supriya Sule
अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो पण लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठ्ठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती… @supriya_sule
तुम्ही मुलीवर लोकल रेल्वेत बलात्कार झाल्याचं ट्विट केलंय पण तसं काहीच घडलं नाही. नाहक मुलीची बदनामी करू नका..
त्या आरोपीनं मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला… पोलिसांनी लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल त्याला अटक केली… ही वस्तुस्थिती. आपण @grpmumbai
आयुक्त यांच्याकडूनही माहिती घेऊ शकला असता
पण ते न करता बलात्कार झाला म्हणत ट्वीट केलत..
तुमच्या या वक्तव्यामुळे खोट्या बातम्यांचा आणि अफवांचा सुकाळ होण्यास हातभार लागणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अफवा पसरवू नका आणि माझी संपूर्ण जनतेला विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका !
अत्याचार करण्याचा प्रयत्न असेल किंवा अत्याचार हे दोन्ही गंभीर आहे. महिला सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाहीच
लोकल मध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देणं ही रेल्वे पोलिसांची @RPFCR
जबाबदारी आहे, त्यापासून पळ काढता येणार नाही. या निमित्तानं रेल्वे हेल्पलाईन आणि लोकल मधील महिलांबाबतचे गुन्हे याचं ॲाडीट करणं गरजेचं आहे व ते येणाऱ्या दिवसात नक्कीच होईल.
अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो पण लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठ्ठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती…… pic.twitter.com/dbGaA6TEhk
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 15, 2023
दरम्यान, पीडित तरुणी गिरगाववरून बेलापूरला लोकल ट्रेननं जात होती. या तरुणीचं वय 20 वर्ष आहे. परीक्षेसाठी ही तरुणी लोकलने प्रवास करत होती. डब्यामध्ये कोणी नाही, हे बघून आरोपी डब्यात शिरला आणि त्यानंतर मुलीचा छळ केला. या प्रकरणी तरुणीने लगेच पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपीला लगेच अटक केले.
महत्वाच्या बातम्या
- Abdul Sattar | कृषी महामंडळात 150 कोटींचा घोटाळा; दैनिक सामनातून अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप
- Sharad Pawar – शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांचा BRS पक्षात प्रवेश
- Sanjay Gaikwad | बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपची महाराष्ट्रात काय औकात होती? शिंदेगट -भाजप मध्ये वाद वाढला
- Sunil Raut | ती एक कीड होती, जी निघून गेली; सुवर्णा कारंजे यांच्या पक्षांतरावर सुनील राऊतांची प्रतिक्रिया
- Supriya Sule | चालू लोकलमध्ये महिला डब्यात तरुणीवर बलात्कार, सुप्रिया सुळे यांची संतापजनक प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










