Sanjay Gaikwad | बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपची महाराष्ट्रात काय औकात होती? शिंदेगट -भाजप मध्ये वाद वाढला

Sanjay Gaikwad | मुंबई: भाजप आणि शिंदे गट यांच्यातील वाद वाढत चालला आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर टीका केली आहे.

Anil Bonde criticizes Eknath Shinde

भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीकास्त्र चालवलं होतं. बेडूक किती फुगलं तरी हत्ती बनू शकत नाही, असा खोचक वार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता. त्यांच्या या वक्तव्याला संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP grew up in Maharashtra holding the hand of Balasaheb Thackeray

संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, “भाजप पूर्वी कुणाच्या संगतीत होता? कुणाबरोबर भाजप महाराष्ट्रात मोठा झाला आहे? याचा विचार भारतीय जनता पक्षानं केला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांचा हात धरून भाजप महाराष्ट्रात मोठा झाला आहे. बाळासाहेब नसते तर भाजपची महाराष्ट्रात काय औकात होती?”

Sanjay Gaikwad replied bjp Anil Bonde

पुढे बोलताना ते (Sanjay Gaikwad) म्हणाले, “एकनाथ शिंदे हे वाघ आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 50 वाघांमुळे भाजप मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं आहे. एकनाथ शिंदे राज्यात कामं करतात. त्यामुळे त्यांना बेडकाची उपमा देणं, हे अत्यंत चुकीचं आहे. शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्याबद्दल बोलताना अनिल बोंडे यांच्यासारख्या खासदारांनी विचार करून बोलायला हवं.”

दरम्यान, शिंदे-भाजप वाद सुरू असताना उल्हासनगरमध्ये भाजपचे बॅनर झळकले आहे. या बॅनरच्या माध्यमातून भाजपनं शिंदे गटाला त्यांची जागा दाखवून दिली असल्याचं दिसून आलं आहे. ’50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है’ असा मजकूर छापत भाजपनं शिंदे गटाला डिवचलं आहे. त्याचबरोबर या बॅनरवर बड्या भाजप नेत्यांचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.