Sanjay Raut | मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी याबद्दल माहिती दिली होती. या सर्व प्रकरणानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांना धमकी देणारा व्यक्ती सुनील राऊत (Sunil Raut) यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
Sanjay Raut was threatened by Mayur Shinde
संजय राऊत (Sanjay Raut) यांना मयूर शिंदे (Mayur Shinde) या व्यक्तीकडून धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. धमकी प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे म्हटलं जात आहे. सुनील राऊत यांनीच संजय राऊत यांना धमकवण्यासाठी सांगितले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
या प्रकरणात पोलीस तपास झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासानुसार, सुनील राऊत यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात हा कट रचला असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. आरोपी मयूर शिंदे यांचे संजय राऊत आणि सुनील राऊत दोघांसोबतही भरपूर फोटो आहे. वाढदिवसाचा केक भरताना देखील मयूर शिंदेचा त्यांच्यासोबत फोटो आहे.
Disclosure of Nitesh Rane
या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी देखील मोठा खुलासा केला आहे. नितेश राणे म्हणाले, “राऊतांनी कार्यकर्त्याला धमकी देण्यास सांगून फोन रेकॉर्ड केला आहे. खोटं बोलणं हे राऊत यांच्या रक्तात आहे.”
दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांना एका फोन कॉलच्या माध्यमातून जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचं सुनील राऊत यांनी सांगितलं होतं. सुनील राऊत म्हणाले, “मला माझ्या फोनवर कॉल आला होता. दररोज सकाळी माध्यमांसोबत बोलणं बंद करा, असं संजय राऊत यांना सांगा. नाहीतर संजय राऊत यांच्यासोबत तुम्हालाही मारू.”
महत्वाच्या बातम्या
- Vande Bharat Express | पावसामुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पाणीच पाणी! पाहा VIDEO
- Sanjay Shirsat | “येणाऱ्या काळात भाजपचं अवघड…”; संजय शिरसाटांचा फडणवीस गटाला इशारा
- Devendra Fadnavis । ’50 कुठं आणि 105 कुठं? शिंदे गटाला त्यांची जागा दाखवायला लावले बॅनर्स?
- Devendra Fadnavis | भाजप आणि शिंदे गट वाद पेटला! कुणी आणि कुठे लावले बॅनर्स?
- Gautami Patil | गौतमीचा नृत्यप्रकार कोणता काय माहित? माधुरीचं गौतमीवर टीकास्त्र