Devendra Fadnavis | उल्हासनगर: भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde group) यांच्या युतीतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी खासदारकी पदाचा राजीनामा देण्याचं वक्तव्य केलं होतं. अशात उल्हासनगर शहरात भाजप आणि शिंदे गटाची बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे. शिंदे गटनं उल्हासनगरमध्ये बॅनर लावून भाजपला डिवचलं होतं. शिंदे गटाच्या या कृतीला भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे.
Devendra Fadnavis vs Eknath Shinde Banner War
शिवसेना शिंदे गट आणि भाजपचं (Devendra Fadnavis) बॅनरवॉर उल्हासनगर शहरामध्ये सुरू आहे. ’50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है’ असा मजकूर छापत भाजपनं शिंदे गटाला डिवचलं आहे. त्याचबरोबर या बॅनरवर बड्या भाजप नेत्यांचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे.
उल्हासनगर शहरातील मार्केट एरियामध्ये हे (Devendra Fadnavis) बॅनर लावण्यात आलेले आहे. या बॅनरबाजीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या बॅनरबाजी नंतर राजकीय वर्तुळातील काय प्रतिक्रिया येतील याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गट भाजपसमोर बॅकफुटवर
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, “जाहिरातीशी शिवसेना पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभचिंतकांनं ही जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये आमचं युती सरकार एक नंबरला आहे, याचा आम्हाला आनंद आहे.”
त्याचबरोबर ही जाहिरात कोणी आणि कुठे दिली? हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. या जाहिरातीशी शिवसेना पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून जाहिरात देणारा हा शुभचिंतक कोण? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटातील पाच मंत्र्यांची हकालपट्टी करण्याच्या भाजप (Devendra Fadnavis) तयारीत आहे. यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड या एकनाथ शिंदेच्या शिलेदारांचा समावेश आहे.
‘मुख्यमंत्री शिंदेंनी अब्दुल सत्तारांना झाप-झापले’; सत्तारांनी थेट हातच जोडले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्तार, तुमचे जे चालले आहे, ते वाईट आहे. तुम्ही कारभार सुधारा, असा बेबंदपणा बरा नाही. तर तुम्ही सरकारची पत धुळीला मिळवताय, या शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांना झाप-झापले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांसमोर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना ‘झाप-झापले’. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असून, यापुढे अशा घटना होऊ नयेत असा दम सत्तार यांना देण्यात आला आहे. शिंदेंचा पारा पाहून सत्तारांनी थेठ हात जोडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- Maharashtra Govt Staff । सरकारी कर्मचार्यांचा एका दिवसाचा पगार होणार राजकीय जाहिरातीसाठी खर्च? शिंदेंच्या कारभारावर विरोधक भडकले
- Sharad Pawar – शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीचे तीन बडे नेते ‘घड्याळ’ सोडून ‘BRS’ च्या वाटेवर
- Eknath Shinde | ‘ मै हु डॅान ‘ चा प्रयोग जोरात आपटल्यानंतर आज ‘ हम साथ साथ है; एकनाथ शिंदेंची नवी जाहीरात
- Weather Update | बिपरजॉयची तीव्रता वाढली! मान्सून आणखीन लांबणार?
- Shambhuraj Desai | जाहिरातीशी शिवसेना पक्षाचा संबंध नाही; जाहिरातीवरून शिंदे गट बॅकफूटवर