Shambhuraj Desai | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? या संदर्भात एक जाहिरात छापण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या सर्व प्रकरणावर शंभूराजे देसाई यांनी भाष्य केलं आहे. आजच्या जाहिरातीशी शिवसेनेचा कसलाही संबंध नाही, असे ते यावेळी म्हणाले आहे.
We are happy that our coalition government is number one – Shambhuraj Desai
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, “आजच्या जाहिरातीशी शिवसेना पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभचिंतकांनं ही जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये आमचं युती सरकार एक नंबरला आहे, याचा आम्हाला आनंद आहे.”
पुढे बोलताना ते (Shambhuraj Desai) म्हणाले, “आम्ही ही जाहिरात दिलेली नाही. त्याचबरोबर ही जाहिरात कोणी आणि कुठे दिली? हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. या जाहिरातीशी शिवसेना पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून जाहिरात देणारा हा शुभचिंतक कोण? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
जाहिरातीनंतर शिंदे गटानं यु-टर्न घेतल्याचं दिसून आलं आहे. शिंदे गट भाजपसमोर बॅकफुटवर गेल्याच्या चर्चा आहे. भाजप शिंदे गटाला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटातील पाच मंत्र्यांची हकालपट्टी करण्याच्या भाजप तयारीत आहे. यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड या एकनाथ शिंदेच्या शिलेदारांचा समावेश आहे.
Eknath Shinde Forgot Balasaheb Thackeray – Ajit Pawar
या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. मात्र, या जाहिरातीमध्ये कुठेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. यावर बोलताना अजित पवार म्हणाले (Ajit Pawar), “शिंदे गट म्हणतो आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहोत. मात्र त्या जाहिरातीमध्ये कुठेही बाळासाहेबांचा फोटो नाही. एकनाथ शिंदे यांनी ही जाहिरात करून स्वतःचं हसू करून घेतलं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane | “मी शिवसेनेत असतो तर…”; एकनाथ शिंदेंच्या बंडावर नारायण राणे यांची प्रतिक्रिया
- Gautami Patil | गौतमीसोबत तिच्या आईचा व्हिडिओ व्हायरल! पाहा VIDEO
- Eknath Shinde | बोगस विक्रेत्यांवर धाडी टाकाच; अब्दुल सत्तारांच्या घोटाळेबाज धाडीवर काय कारवाई करणार
- Supriya Sule – कमी मार्काने पास झालो हे जाहिरातीतून सांगणारा एकनाथ शिंदेंचा पहिलाच पक्ष – सुप्रिया सुळे
- Ajit Pawar | एकनाथ शिंदेंनी जाहिरातबाजीतून स्वतःचं हसू करून घेतलय – अजित पवार