Eknath Shinde | ‘ मै हु डॅान ‘ चा प्रयोग जोरात आपटल्यानंतर आज ‘ हम साथ साथ है; एकनाथ शिंदेंची नवी जाहीरात

मुंबई – राज्यातील उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? या संदर्भात एक जाहिरात छापण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आज पुन्हा एकदा शिंदे सरकारची जाहिरात छापून आलीये. त्यात आता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो सहित मंत्रिमंडळातील शिंदेंचे शिलेदार दिसत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना हि शिंदेंच्या जाहिरातीत स्थान मिळाले आहे.

कालच्या जाहिरातींवरून शिंदे सरकार अडचणीत सापडले होते. विरोधकांनी तसेच भाजप चे नेते शिंदे गटावर नाराज झाले होते. त्यामुळे आज हम साथ साथ है ची जाहिरात केली असल्याची चर्चा आहे.

रोहित पवारांची जाहिरातीवर टीका । Rohit Pawar Tweet On Eknath Shinde Advertise 

इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो! सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय… यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय.. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का?

जाहिरातीशी शिवसेना पक्षाचा संबंध नाही; जाहिरातीवरून शिंदे गट बॅकफूटवर

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, “आजच्या जाहिरातीशी शिवसेना पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभचिंतकांनं ही जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये आमचं युती सरकार एक नंबरला आहे, याचा आम्हाला आनंद आहे.”

पुढे बोलताना ते (Shambhuraj Desai) म्हणाले, “आम्ही ही जाहिरात दिलेली नाही. त्याचबरोबर ही जाहिरात कोणी आणि कुठे दिली? हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. या जाहिरातीशी शिवसेना पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून जाहिरात देणारा हा शुभचिंतक कोण? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

शिंदे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांची हकालपट्टी करा; भाजपचा सज्जड दम

शिंदे-फडणवीस सरकारमधील शिंदे गटातील पाच मंत्र्यांची हकालपट्टी करण्याच्या भाजप तयारीत आहे. यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड या एकनाथ शिंदेच्या शिलेदारांचा समावेश आहे.

Eknath Shinde Forgot Balasaheb Thackeray – Ajit Pawar

या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. मात्र, या जाहिरातीमध्ये कुठेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. यावर बोलताना अजित पवार म्हणाले (Ajit Pawar), “शिंदे गट म्हणतो आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहोत. मात्र त्या जाहिरातीमध्ये कुठेही बाळासाहेबांचा फोटो नाही. एकनाथ शिंदे यांनी ही जाहिरात करून स्वतःचं हसू करून घेतलं आहे.”

नवीन जाहिरात ( एकनाथ शिंदे गट )

 

Fyjoa6laEAAy6Pl

जुनी जाहिरात ( एकनाथ शिंदे गट )

FyjoaizaYAAjEnb

महत्वाच्या बातम्या –