Weather Update | बिपरजॉयची तीव्रता वाढली! मान्सून आणखीन लांबणार?

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy) थैमान घालत आहे. या चक्रीवादळाची तीव्रता आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर या चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार का नाही? याबाबत हवामान खात्याकडून अपडेट देण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनला (Monsoon) पुढे जाण्यास मदत मिळाली आहे.

Cyclone Biparjoy will not affect monsoon

बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र, या चक्रीवादळाचा गुजरातला मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Weather Update) आहे. कच्छ, द्वारका आणि जामनगर या जिल्ह्यांना चक्रीवादळामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यासह गोवा, गुजरात, बंगाल, अंदमान-निकोबार आणि सिक्कीम या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळे 14 आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील जामनगर, पोरबंदर, राजकोट, जुनागड, द्वारका या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम अधिक प्रमाणत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.