Vande Bharat Express | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने नुकतीच वंदे भारत एक्सप्रेस नवीन रेल्वे सुरू केली आहे. देशामध्ये तब्बल 18 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंदे भारत एक्सप्रेस गडबडीत बनवण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशात वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Vande Bharat Express first rain video viral on social media
वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चा पहिल्या पावसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक्सप्रेसचं छत गळताना दिसत आहे. तिरुअनंतपुरम-कासारगोड या नवीन वंदे भारतच्या एक्सक्लुझिव्ह कोचमध्ये पावसामुळे गळती झाली आहे. रेल्वेच्या एसी कोचमध्ये हा प्रकार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रेल्वेमध्ये उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थाचे ट्रेच्या मदतीने कोचमधील पाणी थांबवण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचारी करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. बोगीमध्ये खूप पाणी सचलेले दिसत आहे. गेल्या वर्षात वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चे अनेक अपघात झाले होते. त्यामुळे या एक्सप्रेसवर लोक निशाणा साधत आहेत.
Farewell blankets, hello umbrellas: Vande Bharat redefines comfort. pic.twitter.com/8mTKeaqkYL
— Congress Kerala (@INCKerala) June 14, 2023
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर वापर करते या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत. केरळ काँग्रेसने हा वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) चा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | “येणाऱ्या काळात भाजपचं अवघड…”; संजय शिरसाटांचा फडणवीस गटाला इशारा
- Devendra Fadnavis । ’50 कुठं आणि 105 कुठं? शिंदे गटाला त्यांची जागा दाखवायला लावले बॅनर्स?
- Devendra Fadnavis | भाजप आणि शिंदे गट वाद पेटला! कुणी आणि कुठे लावले बॅनर्स?
- Gautami Patil | गौतमीचा नृत्यप्रकार कोणता काय माहित? माधुरीचं गौतमीवर टीकास्त्र
- Cyber Crime | वर्क फ्रॉम होमचं आमिष दाखवून केली महिलेची फसवणूक, तब्बल 18 लाख रुपयांचा लावला चुना