Cyber Crime | नाशिक: वाढत्या टेक्नॉलॉजीचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे पण आहेत. वाढत्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. असाच काहीतरी प्रकार नाशिकच्या खुटवडनगरमध्ये घडला आहे. या ठिकाणच्या एका महिलेला वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे.
Work from home and earn lakhs of rupees
नाशिकच्या खुटवडनगरमधील 32 वर्षीय पूनम नावाच्या महिलेची फसवणूक (Cyber Crime) करण्यात आली आहे. ही महिला एक दिवस मोबाईलवर सर्फिंग करत होती. त्यामध्ये तिला ‘वर्क फ्रॉम होम करा आणि लाखो रुपये कमवा’ अशी ऑफर दिसली. पैसे कमवण्याच्या उद्देशाने तिने ती ऑफर स्वीकारली आणि काम करायला सुरुवात केली.
काम सुरू झाल्यावर त्यांनी तिला एका बँक खात्यावर ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून एक प्रश्नावली पाठवली. ही प्रश्नावली पूर्ण केल्यास तुम्हाला पैसे मिळतील (Cyber Crime) असं तिला सांगण्यात आलं. आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याची खात्री पटल्यानंतर पूनमने महिनाभर ही प्रश्नावली सोडवली. हे करत असताना तिने 24 बँक खात्यातून तब्बल 18 लाख 18 हजार रुपयांची रक्कम त्यांना दिली.
रक्कम भरूनही पूनमच्या बँक खात्यात पैसे जमा होत (Cyber Crime) नव्हते. त्यानंतर त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली. सायबर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde । ‘सत्तार कारभार सुधारा…सरकारची पत धुळीला मिळवताय शिंदेंनी सत्तारांना झाप-झापले’; सत्तारांनी थेट हातच जोडले
- Maharashtra govt staff । सरकारी कर्मचार्यांचा एका दिवसाचा पगार होणार राजकीय जाहिरातीसाठी खर्च? शिंदेंच्या कारभारावर विरोधक भडकले
- Sharad Pawar – शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीचे तीन बडे नेते ‘घड्याळ’ सोडून ‘BRS’ च्या वाटेवर
- Eknath Shinde | ‘ मै हु डॅान ‘ चा प्रयोग जोरात आपटल्यानंतर आज ‘ हम साथ साथ है; एकनाथ शिंदेंची नवी जाहीरात
- Weather Update | बिपरजॉयची तीव्रता वाढली! मान्सून आणखीन लांबणार?