Gautami Patil | सोलापूर: सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. कोणत्याही ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. त्याचबरोबर तिच्या नृत्यामुळे ती अनेकदा वादात सापडते. नृत्यासोबतच गौतमी आडनावावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिच्या नृत्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने गौतमीवर टीका केली आहे.
What is Gautami’s type of dance? – Madhuri Pawar
माधुरी पवारनं गौतमीचं (Gautami Patil) नाव न घेता तिच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. माधुरी म्हणाली, “गौतमी करत असलेल्या नृत्याचा प्रकार कोणता आहे? मला माहित नाही. नृत्य करणाऱ्याला माहित असावा आपण कोणता नृत्य प्रकार करत आहोत. मी कधी तिचा कार्यक्रम पाहिलेला नाही. मात्र, पाहिल्यावर कळेल तिचा नृत्य प्रकार कोणता आहे.”
गौतमीच्या (Gautami Patil) आडनाव वादावर देखील माधुरीने प्रतिक्रिया दिली आहे. “कुणी काय आडनाव लावाव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी माझ्या वडिलांचं आडनाव वापरते. त्यामुळे कुणी माझ्यावर आक्षेप घ्यावा, असं मी काहीच करत नाही, असा अप्रत्यक्ष टोला देखील माधुरीनं गौतमीला लगावला आहे.
दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) अल्पकालावधीतच आपल्या नृत्याने प्रसिद्ध झाली आहे. तिच्या नृत्यावर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. तिच्या नृत्यावर मराठी सिने क्षेत्र ते लावणी कलाकारापर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया देत तिचा विरोध केला होता.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde । ‘सत्तार कारभार सुधारा…सरकारची पत धुळीला मिळवताय शिंदेंनी सत्तारांना झाप-झापले’; सत्तारांनी थेट हातच जोडले
- Maharashtra govt staff । सरकारी कर्मचार्यांचा एका दिवसाचा पगार होणार राजकीय जाहिरातीसाठी खर्च? शिंदेंच्या कारभारावर विरोधक भडकले
- Sharad Pawar – शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीचे तीन बडे नेते ‘घड्याळ’ सोडून ‘BRS’ च्या वाटेवर
- Eknath Shinde | ‘ मै हु डॅान ‘ चा प्रयोग जोरात आपटल्यानंतर आज ‘ हम साथ साथ है; एकनाथ शिंदेंची नवी जाहीरात
- Weather Update | बिपरजॉयची तीव्रता वाढली! मान्सून आणखीन लांबणार?