Amruta Fadanvis | मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या त्या त्यांच्या ‘मैने मूड बना लिया’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. त्यांचं हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यांच्या या गाण्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. अशा परिस्थितीत काल अमृता फडणवीस यांनी सोशल मीडिया स्टार रियाज अली सोबत ‘मैने मूड बना लिया’ गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सनंतर एक नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमृता फडणवीस यांची ही क्लिप रियाजसोबत आहे म्हणून नाही, तर ही क्लिप सरकारी बंगल्यात शूट केल्यामुळे चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी प्रवक्त्या हेमा पिंगळे यांनी अमृता फडणवीस यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर नेटकरी देखील यावरून अमृता फडणवीस यांच्या व्हिडिओवर कमेंट करत आहे.
अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या व्हिडिओवरील कमेंट्स
Amruta Fadanvis | "उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आज रिल व्हिडिओ…" ; अमृता फडणवीस यांची 'ती' क्लिप वादातhttps://t.co/nePAYARkRA
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) January 19, 2023
राष्ट्रवादी प्रवक्त्या हेमा पिंगळे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, “गानकोकिळा आणि नृत्यांगना अमृता फडणवीस संविधानिक पदावरील व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या गैरवापर करत आहे. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ सरकारी बंगल्यात बनवला आहे. हे रील बनवताना त्यांनी सरकारची परवानगी घेतली होती का?” अमृता फडणवीस यांनी सरकारी बंगल्यात रिल व्हिडिओ शूट केल्यानंतर नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमृता फडणवीस यांचा नुकतंच रिलीज झालेलं ‘आज मैं मूड बना लिया’ गाणं एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यामध्ये प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा हटके अंदाज बघायला मिळाला आहे. या गाण्यामध्ये त्यांनी डान्स देखील केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात थंडीचा कडाका कायम, तर ‘या’ भागांत पाऊसाची शक्यता
- Brijbhushan Singh | बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ; महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाचे आरोप
- Congress | “…त्याला आपण देहविक्री म्हणतो, मग स्वत:ला विकणाऱ्या आमदारांना…”; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्यावरुन वाद
- Shivsena | “याचा अर्थ सगळे भाजप धुतल्या तांदळासारखे”; सेनेने जाहीर केली ईडीची चौकशी झालेल्या नेत्यांची नावे
- Nana Patole | “भाजपासारख्या हुकूमशाही व्यवस्थेला संपवण्यासाठी…”; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात